अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) आज 30 वा वाढदिवस आहे.



कियारा तिच्या चित्रपटांमुळे आणि स्टनिंग लूक्समुळे चर्चेत असते.



सोशल मीडियावर कियारा सक्रिय असते.



अनेक सेलिब्रिटी तसेच कियाराचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.



कियारानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिचं नाव बॉलिवूडच्या भाईजाननं म्हणजेच अभिनेता सलमान खाननं बदललं. कियाराचं खरं नाव आलिया अडवाणी असं आहे.



कियारानं 2014 मध्ये 'फगली' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटामुळे कियाराला विशेष ओळख मिळाली.



आज कियाराचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये घेतलं जातं.



एका रिपोर्टनुसार कियाराकडे 23 कोटींची संपत्ती आहे. कियारा ही एका चित्रपटासाठी दोन ते तीन कोटी मानधन घेते.



कियाराचं मुंबईमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत 15 कोटी आहे.