बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही सध्या तिच्या तेजस या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



कंगनाचा तेजस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.



कंगनानं काही दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले.



50 वर्षांच्या इतिहासात रावण दहन करणारी कंगना पहिली महिला ठरली आहे.



अनेक जण कंगनाचे यानिमित्ताने कौतुक करत आहेत. पण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र ट्वीटच्या माध्यमातून कंगनावर टीका केली.



सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्वीटला कंगनानं सडेतोड उत्तर दिलं आहे.



सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, रामलीलाच्या शेवटच्या दिवशी कंगनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणे हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा अनादर केल्यासारखं आहे, हे एक प्रकारे चुकीचे आहे.



कंगनानं सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केलेल्या ट्वीटला रिप्लाय दिला, एक स्विमसूटमधील फोटो शेअर करुन तुम्ही अशा गोष्टी कशा सांगू शकता? राजकारणात येण्यासाठी माझ्याकडे माझ्या देहाशिवाय दुसरे काहीही नाही, असे तुम्ही सुचवत आहात.



पुढे कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी एक कलाकार आहे, हिंदी चित्रपटांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माझ्या जागी एखादा तरुण असता तर राजकारणात येण्यासाठी कदाचित तो शरीर विकतोय, असे तुम्ही म्हणाल का?'



पुढे कंगनानं लिहिलं, स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे इतर अवयव असतात जसे की, मेंदू, हृदय, हात, पाय आणि इतर सर्व काही जे पुरुषाकडे असते किंवा एक महान नेता होण्यासाठी आवश्यक असते.