बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत (kangana Ranaut) ट्वीटरवर पुन्हा परतली आहे.
कंगना रनौत हिनं ट्वीट करत ट्विटरवर परतल्याचं सांगितलं आहे.
ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कंगना रनौतचं ट्विटर खातं बॅन करण्यात आले होते.
आता तब्बल 20 महिन्यानंतर ती पुन्हा ट्वीटरवर परत आली आहे.
Hello everyone, it’s nice to be back here असं ट्वीट करत
अभिनेत्री कंगना रनौत हिनं आपलं ट्वीटरवर परत आल्याचं सांगितलं.
कंगनाच्या या ट्वीटवर अनेकांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी मिम्स शेअर करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्वीटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 2021 मध्ये तिचं ट्विटर खातं बंद करण्यात आले होते.
इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंगना ट्विटरवर पुन्हा येऊ शकते अशा चर्चांना वेग आला होता.