अभिनेत्री रकुलने नुकते इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बॉसी लूक दिसतोय. बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीतच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. रकुलचा अभिनयाबरोबरच ड्रेसिंग सेन्सही फार चांगला आहे. रकुल प्रीतने नुकतेच तिचे ब्लेझरमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रकुलचा बॉसी लूक दिसतोय. रकुलने तिच्या दमदार अभिनयाने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. रकुलच्या प्रत्येक भूमिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. अनेक मुलींना ऑफिसमध्ये कोणते कपडे घालायचे याबात गोंधळ होतो. अशा वेळी रकुलचा हा लूक तुम्ही कॅरी करू शकता. रकुल दक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलीवूड चित्रपटांमध्येही दमदार अभिनय करते. चित्रपटांव्यतिरिक्त रकुल तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. रकुल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या स्टाईलची चाहत्यांमध्ये फार क्रेझ आहे. हाय हिल्ससह ब्लेझरमध्ये ही स्टाइल पाहून सगळ्यांना तिने भुरळ घातली आहे. रकुलने ब्लेझर स्टाईलमध्ये पांढरा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तिने हा लूक न्यूड पिंक ग्लॉसी मेकअपने पूर्ण केला आहे.