‘स्टार किड’ जान्हवी कपूरने इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींच्या यादीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.



जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.



सोशल मीडियावरही तिचे खूप चाहते आहेत. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आणि चाहत्यांना तिच्या नवीन प्रोजेक्ट 'मिस्टर अँड मिसेस माही'बद्दल माहिती दिली आहे.



या फोटोमध्ये जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे.



तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. यावर कमेंट करताना डिझायनर मनीष मल्होत्राने तिला आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



शरण शर्मा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. याआधी त्यांनी जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता.



करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने 'मिस्टर अँड मिसेस माही'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



जान्हवी कपूर आणि राजकुमार राव याआधीही एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकले आहेत. हे दोन्ही कलाकार 'रुही' या चित्रपटात एकत्र दिसले होते.