अभिनेत्री शेफाली शाहनं फिल्म 'डार्लिंग्स' आणि वेब सीरिज 'दिल्ली क्राइम 2' मध्ये आपल्या अभिनयानं इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय अभिनेत्री शेफालीनं आपल्या फॅशन आणि स्टाईलनं सर्वांची मनं जिंकली. बॉलीवुड अभिनेत्री शेफाली शाहने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये शेफाली ब्लॅक अँड व्हाईट साडीमध्ये दिसून आली होती. अभिनयासोबतच शेफाली फॅशन आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते. सध्या ब्लॅक अँड व्हाईट साडीमधील फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. शेफालीचा वेस्टर्न अंदाजावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कानात झुमके, न्यूड मेकअप आणि मोकळे केस शेफालीच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा झालेत. शेफालीनं फार कमी वयातच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शेफाली लवकरच आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी'मध्ये दिसून येणार आहे.