बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याची आज दुसरी पुण्यतिथी आहे.
दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला होता.
इरफाननं वयाच्या 54 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आजही इरफानचे चाहते त्याचे चित्रपट आवडीनं पाहतात.
इरफाननं एका व्हिडीओच्या माध्यमातून खास मेसेज चाहत्यांना दिला होता.
व्हिडीओमध्ये इरफान म्हणतो, 'नमस्कार मी इरफान, मी आज तुमच्यासोबत आहे पण आणि नाही पण. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे.'
'मला या चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. पण सध्या माझ्या शरीरामध्ये काही अनवॉन्टेड पाहूणे आहेत. ज्यांच्यासोबत माझं बोलणं सुरू आहे. ', असंही इरफान म्हणाला.
इरफान पुढे म्हणाला, , 'व्हेन लाइफ गिव यू ए लेमन मेक ए लेमोनेड' पण हे फक्त बोलायला चांगलं आहे. जेव्हा आयुष्य खरंच हातात लिंबू देतं तेव्हा त्याची शिकंजी तयार करणं खूप कठिण असतं.'
इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये जयपूर येथे झाला होता.