बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासाठी एप्रिल महिन्याची सुरुवात खूपच वाईट होती.

महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी तिच्या कारचा अपघात झाला होता.

या अपघातात मलायका जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.

या अपघातात मलायकाला फारशी दुखापत झाली नाही. अपघाताच्या 26 दिवसांनंतर तिने एक सेल्फी शेअर केला आहे.

सेल्फीतून मलायका चाहत्यांना तिच्या कपाळावर झालेली जखम दाखवत आहे.

या अपघातानंतर मलायकाने काही दिवस ब्रेक घेतला होता.

अपघातानंतर तिने आपल्या चाहत्यांना याबाबत सांगितले होते. परंतु, जखम दाखवली नव्हती.

आता तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक शेल्ली शेअर केला आहे.

मलायकाने शेअर केलेल्या सेल्फीमध्ये दुखापतीच्या खुणा दिसत आहेत.

जखम बरी झाल्यानंतर मलायकाने आता परत कामाला सुरूवात केली आहे.