हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जगातील सर्वात श्रीमंत मंदिर भारतात आहे.

Image Source: pexels

हे मंदिर म्हणजे केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर होय. तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह हे मंदिर भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते.

Image Source: pexels

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर 3 लाख कोटींपेक्षा जास्त एकूण संपत्तीसह भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर आहे.

Image Source: pexels

महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिराकडे सुमारे 2000 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड आहे. यासह हे मंदिर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

Image Source: pexels

अमृतसरचे सुवर्ण मंदिर 400 किलोपेक्षा जास्त सोन्याने मढलेले आहे आणि वार्षिक 500 कोटी रुपयांच्या उत्पन्नासह या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

Image Source: pexels

जम्मूचे वैष्णो देवी मंदिर वर्षाला 500 कोटींपेक्षा जास्त कमाईसह भारतातील पाचवे सर्वात श्रीमंत मंदिर आहे.

Image Source: pexels

8000 करोडहून अधिक मालमत्तेसह अयोध्येतील राम मंदिर यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

Image Source: pexels

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर 200 कोटींपेक्षा जास्त संपत्तीसह या यादीत आहे.

Image Source: pexels

यादीत ओडिसा येथील जगन्नाथ पुरी आणि दिल्लीतील अक्षरधाम मंदिराचाही समावेश आहे.

Image Source: pexels