पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुद्वारा पाटणा साहिब येथे जाऊन प्रार्थना केली,
यावेळी गुरुद्वारामध्ये लंगरसेवा देण्याचं कामही पंतप्रधानांनी केल.
डोक्यावर पगडी परिधान करुन मोदींनी गुरुद्वारामध्ये पाटणा साहिब यांच्यापुढे माथा टेकवला.
त्यानंतर, येथील शिख बांधवांनी आपुलकीचा संवादही साधला.
नरेंद्र मोदींनी आज बिहारच्या पाटणामधील गुरुद्वारा पाटणा साहिबला भेट दिली.
तत्पूर्वी रविवारी पाटणा येथे मोदींनी निवडणूक प्रचारार्थ रोड शो देखील केला आहे.
नरेंद्र मोदी आज हाजीपूर येथील जनसभेला संबोधित करणार आहेत.
त्यामुळे, आज सकाळीच त्यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी, लंगरसेवाही दिली.
मोदींनी येथे लंगरसेवा देताना स्वत:च्या हाताने चपाती लाटल्याचं दिसून आले,
तर भोजनगृहात भेट देऊन लंगरभोजन करणाऱ्या भाविकांना स्वत:च्या हाताने जेवण वाढले.