1 ऑगस्टपासून काय काय बदलणार?; A टू Z माहिती

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

आज महिन्याचा पहिला दिवस, आजपासून आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक बदल होणार आहेत.

Image Source: PINTEREST

काही तुमच्या खिशाला परवडणारे, तर काही बदल तुमच्या खिशाला चाप लावणार आहेत.

Image Source: PINTEREST

त्यामुळे आजपासून झालेल्या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

Image Source: PINTEREST

आजपासून UPI संदर्भातील नवे नियम लागू होणार आहेत.

Image Source: PINTEREST

आजपासून गुगल पे, फोन पे, पेटीएम यूजर्स दिवसातून 25 वेळा बॅलन्स आणि ट्रांझॅक्शन हिस्ट्री पाहू शकतील .

Image Source: PINTEREST

UPI ऑटो पे सकाळी 10 पूर्वी, दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9.30 नंतर होणार आहेत.

Image Source: PINTEREST

एका महिन्यात 10 वेळा चार्जबॅक रिक्वेस्ट करता येतील.

Image Source: PINTEREST

1 ऑगस्टपासून गॅस सिलेंडरचे दर बदललेत, प्रमुख शहरांमध्ये 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती 33-35 रुपयांनी घटलेत.

Image Source: PINTEREST

1 ऑगस्ट रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरांतही बदल होण्याची शक्यता असून, याचा परिणाम वाहतूक खर्चावर होऊ शकतो.

Image Source: PINTEREST

11 ऑगस्टपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील अपघात विमा संरक्षण बंद होणार आहे.

Image Source: PINTEREST

आरबीआयची पतधोरण समिती 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय घेणार आहे, याचा परिणाम ईएमआय आणि बचतीवर होऊ शकतो.

Image Source: PINTEREST

ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बँका बंद राहतील. यात स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, रविवारी आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी सुट्ट्या असतील.

Image Source: PINTEREST

पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 2 ऑगस्टला 9 ते 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Image Source: PINTEREST