गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला.
Published by: जयदीप मेढे
Image Source: ANI
एअर इंडियाचे विमान विमानतळावर कोसळले. यामध्ये अनेक प्रवासी जखमी होण्याची शक्यता आहे.
Image Source: ANI
अहवालानुसार, एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणार होते. बोईंग ड्रीमलायनर 787 विमान उड्डाणाची तयारी करत होते.
Image Source: ANI
एअर इंडियाच्या या विमानात 242 प्रवासी असण्याची शक्यता आहे. सध्या याबाबत पूर्ण माहिती समोर आलेली नाही.
Image Source: ANI
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या पोहोचल्या आहेत. विमानात भरपूर इंधन भरले होते. त्यामुळे प्रचंड आग आणि धुराचे काळे लोट दिसत आहेत.
Image Source: ANI
अहमदाबाद – सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. AI-171 हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघाले होते, मात्र अवघ्या काही मिनिटांतच ते क्रॅश झाले.
Image Source: ANI
अपघाताची वेळ साधारणपणे 1 वाजून 17 मिनिटांची असून, विमानाचे उड्डाण 1 वाजून 10 मिनिटांनी झाले होते. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Image Source: ANI
या अपघातात आजूबाजूच्या काही इमारतींनाही मोठे नुकसान झाले आहे
Image Source: ANI
घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाल्या आहेत. प्रवाशांचे जीवितहानीबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.