देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसत आहे देशात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे गेल्या 24 तासांत 20 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे शनिवारी दिवसभरात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रात शनिवारी 2 हजार 382 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली, तर आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे देशात गेल्या 24 तासांत 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे शनिवारी दिवसभरात 17 हजार 790 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 30 लाख 81 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 449 इतकी आहे भारताने मोठा विक्रम रचला आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे.