भारताकडून तिनही टी20 सामन्यात दमदार कामगिरी कऱणाऱ्या ईशानने दोन अर्धशतकंही लगावली आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा त्यानेच केल्या असल्याने आजही त्याच्यावर सर्वांची नजर असेल. भारताचा आणखी एक सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडेही सर्वांचे नजर असेल. ऋतुने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक लगावत भारताच्या विजयात मोलाची भागिदारी दिली. आयपीएल 2022 गाजवणाऱ्या हार्दिककडेही अनेकांचे लक्ष आहे. त्याने तीन सामन्यातही चांगली कामगरी केली आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या चहलने या मालिकेतही नावाला साजेशी कामगिरी केली आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही मिळवला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. त्यामुळे आज त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल अशी शक्यता सर्वचजण वर्तवत आहेत.