विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाण्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे.



बीडमध्ये मात्र विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी शाळेला जाण्याची वाट चिखलामुळे बिकट झाली.



बीड शहरात असलेल्या राजमुद्रानगरमधला हा प्रकार घडला.



रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची अवस्था चिखलमय झाली



शाळेची वाट धरली खरी मात्र शाळेजवळ येताच या चिखलात त्यांच्या सायकल रुतू लागल्या



त्यामुळे विद्यार्थ्यांना परत घरीही जाता येईना आणि शाळेतही जाता येईना.



काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या सायकली इथेच सोडून दिल्या आणि ते परत घरी गेले.



सकाळपासून या गल्लीमध्ये ना दूधवाला आला ना कुणाला आपल्या घरातून बाहेर पडता आलं.



संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी नगरपालिकेकडे केली आहे.



Thanks for Reading. UP NEXT

IND vs SA 4th T20: भारताचा संभाव्य संघ

View next story