27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे



केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो, मात्र यावर्षी लवकर येणार



गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता पण यावर्षी मे मध्येच मान्सून येणार



चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे



तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे



भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकऱ्यांना होणार



अंदमानातही मान्सून वेळे आधीच दाखल होणार



यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे



देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी



पोषक वातावरण राहिल्यास केरळनंतर सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता