थंडी सुरु होताच गुळाचा वापर वाढतो. गूळ खाण्यास चविष्ट आहे. तसेच गुळाचे शरिरासाठी अनेक फायदे आहेत. पण, तुम्ही ज्या गुळाचे सेवन करत आहात तो गूळ भेसळयुक्त असू शकतो. भेसळ न केलेला गूळ कसा ओळखावा जाणून घ्या. भेसळ न केलेला गूळ पाण्यात टाकल्यावर वितळू लागतो. तेच जर भेसळयुक्त गूळ पाण्यात टाकला तर, त्या गुळात एकत्रित केलेले पदार्थ गूळ पाण्यात टाकल्यावर ते पाण्याच्या तळाशी जातात. तसेच गूळ घेतांना नेहेमी भुरकट रंगाचा घ्यावा.