शेतीतील काडी कचऱ्याचा समस्येवर आता निराकरण होणार. कारण आता शेतकऱ्यांच्या भेटीला आले आहे बायो पॅलेट यंत्र जे शेतातील कचऱ्याचे जैव इंधनात रूपांत करते. विशेष म्हणजे हे इंधन विकून शेतकरी पैसे कमावू शकतात. तसेच शेतातील काडी कचरा, भुसा अश्या जैविक कचऱ्याच्या समस्येवर, पैसे कमावून देवरा उपाय म्हणजे बायो पॅलेट यंत्र. या यंत्रामुळे शेतातील बारीक केलेला कचरा, कारखान्यांना बॉयलरसाठी लागणाऱ्या जैव इंधनात रूपांतरित होतो. हे इंधन विकावून पैसे कमावता येऊ शकतात. पुणे येथील किसान प्रदर्शनात हे यंत्र समोर आले.