चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते



या मुहूर्तावर हिंगोलीच्या बाजारपेठेत वांग्याने चांगलाच भाव खाल्ला आहे



वांग्याचे भाव हिंगोलीच्या बाजारपेठेत शंभरी पार गेले आहे



एक किलो वांगी घेण्यासाठी ग्राहकांना 120 रुपये मोजावे लागत आहेत



तर टोमॅटोचे भाव मात्र गडाल्याचं पाहायला मिळते आहे



जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे



वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या रोडग्यांचा खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यात येतोय



त्यामुळे मोठ्या प्रमाणात वांग्याची मागणी ग्राहकांकडून केली जाते



या पार्श्वभूमीवर वांग्याचे हे भाव वाढल्याचे पाहायला मिळते



तरी इतर भाजीपाल्याचे भाव मात्र काही प्रमाणात स्थिर आहेत