जास्त घोरल्यानं शरीराला काय नुकसान होतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

घोरणं ही एक सामान्य गोष्ट आहे, पण सतत आणि मोठ्या आवाजात घोरणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Image Source: pexels

एखादी व्यक्ती सतत तेव्हा घोरते, ज्यावेळी आपल्या घशातील किंवा नाकपुडीतील हवेची नळी ब्लॉक होते, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येतो.

Image Source: pexels

जर तुम्हीही रोज घोरत असाल, तर याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, कारण हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, जास्त घोरण्याचे तोटे काय आहेत? सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

जास्त घोरणं स्लीप एपनिया नावाच्या आजाराचं लक्षण असू शकतं, ज्यात श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो आणि पुन्हा सुरू होतो.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त जास्त घोरत असल्यास ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते.

Image Source: pexels

घोरताना शरीरात ऑक्सीजनची पातळी घटते, जे अतिशय धोक्याचं ठरू शकतं.

Image Source: pexels

आणि जास्त घोरणं हृदयाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवतं.

Image Source: pexels

जास्त घोरल्यानं मानेच्या नसा आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.

Image Source: pexels

जास्त घोरं येण्यामुळे चिडचिड, अस्वस्थता आणि डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.