आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटात इन्फेक्शनची समस्या वाढू लागली आहे.
Image Source: pexels
पोटाच्या इन्फेक्शनला गॅस्ट्रोएन्टेराइटिस किंवा पोटचा फ्लू देखील म्हणतात.
Image Source: pexels
अनेकदा या आजारातून बरं होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी वेळ लागतो, पण काहीवेळा ही समस्या वाढू शकते.
Image Source: pexels
जाणून घेऊयात की, पोटात इन्फेक्शन होण्याची कारणं काय?
Image Source: pexels
आपल्या पचनसंस्थेत विषाणू, जीवाणू, परजीवी किंवा बुरशीमुळे पोटाला संसर्ग होतो.
Image Source: pexels
पोटात इन्फेक्शनची सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे, जुलाब आणि उलटी.
Image Source: pexels
याव्यतिरिक्त, चुकीची खाण्यापिण्याची पद्धत, दूषित पाणी आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे पोटात इन्फेक्शन होतं.
Image Source: pexels
आणि काही औषधं किंवा शारीरिक व्याधी देखील पोटाच्या इन्फेक्शनचं कारण बनू शकतात.
Image Source: pexels
जर एखाद्या व्यक्तीसोबत टॉवेल, जेवण किंवा भांडी शेअर करत असाल, ज्याला आधीपासूनच पोटात इन्फेक्शन झालंय, तर तुम्हालाही त्रास होऊ शकतो. ही परिस्थिती विषाणूंमुळे उद्भवते. त्यामुळे गॅस्ट्रोएंटेरिटिस होण्याचा धोका असतो.