शाकाहारी लोकांना रोजच्या जेवणातून पुरेसं आयर्न मिळवण्यास अनेकदा अडचणी येतात, त्यामुळे योग्य त्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे.
भाज्या, कडधान्य यांचा योग्य ताळमेळ असलेला संतुलित आहार शरीराच्या पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
नैसर्गिकरित्या लोहची, आयर्नची कमतरता भरुन काढणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.
पालकमध्ये आयर्न आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे ते निरोगी रक्त वाढवण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत.
मसूर, हरभरा, लाल वाटाणा, सोयाबीन आणि इतर कडधान्य हे आयर्न आणि प्रोटिन्सचा उत्तम शाकाहारी स्रोत आहेत.
अंजीर, खजूर आणि मनुका यांमध्ये लोह आणि नैसर्गिक साखर भरपूर असते, ज्यामुळे थकवा कमी होतो आणि ऊर्जा टिकून राहते.
70% कोको असलेलं डार्क चॉकलेट तुमच्या आहारात लोह वाढवण्याचा आणि मूड सुधारण्याचा एक स्वादिष्ट मार्ग आहे.
टोफू एक आरोग्यदायी शाकाहारी खाद्यपदार्थ आहे, ज्यामध्ये आयर्न, प्रोटिन्स आणि कॅल्शियमनं परिपूर्ण आहे, जे ताकद आणि एकंदरीत आरोग्यासाठी आवश्यक आहे.
भोपळ्याच्या बिया आणि चिया सिड्स हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेलं सुपरफूड आहेत, जे आयर्न तसेच फायबर आणि हेल्दी फॅट्स पुरवतात.