कडधान्य खाण्याने जसा आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो तसेच त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.
काहीवेळा कडधान्य खाल्ल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग, अॅसिसिडिटी, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कडधान्य खाताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून काळजी घेतली पाहिजे.
1. मोड आलेली कडधान्ये पचायला थोडी जड असतात. यामुळे आपल्या पोटात गॅस तयार होऊ शकतो.
कच्ची कडधान्ये खाल्ल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग, अॅसिसिडिटी, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात.
मोड आलेली कडधान्ये चिमूटभर हळद घालून उकडवून खावीत. यामुळे कडधान्यांचे पचन चांगले होते.
मोड आलेली कडधान्ये चिमूटभर हळद घालून उकडवून खावीत. यामुळे कडधान्यांचे पचन चांगले होते.
कडधान्य पचायला सोपे होण्यासाठी तसेच त्यात जर काही सूक्ष्म जिवाणू असतील तर ते काढून टाकण्यासाठी कडधान्य शिजवली तर उत्तम.
कारण यातील प्रोटिन्स पचवणे हे शरीरासाठी कितीही सोपे असते असं म्हटलं तरीही ते पचवण्यासाठी अवधी लागतोच. त्यामुळे कडधान्ये सकाळी किंवा दुपारी खावीत,रात्री कडधान्ये खाणे टाळावे.