महिलांच्या भुवया फारशा वाढत नसल्याचे अनेकदा दिसून येते. यासाठी अनेक महिला महागडे उपचार घेतात पण फायदा होत नाही.

जर तुम्हाला खरच भुवयां वाढवायच्या असेल तर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे भुवयांची वाढ होण्यास मदत होईल.

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधून तेल काढा आणि नंतर ते तुमच्या भुवयांवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

कच्च्या दुधात कापूस भिजवून भुवयांना लावा, सुमारे 20 ते 25 मिनिटानंतर कोमट पाण्याने धूवून घ्या.

तुम्ही तुमच्या भुवयांवर एलोवेरा जेल सुध्दा लावू शकता.

एरंडेल तेलाचे दोन थेंब घ्या भुवयांवर लावा सुमारे 40-45 मिनिटे लावून ठेवा , त्यानंतर ते ओल्या कपड्याने स्वच्छ करा भुवयांची वाढ दिसू शकते.

भुवयांवर खोबरेल तेल लावा. तासभर तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धूवून घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.