आजकाल डॉक्टर निरोगी राहण्यासाठी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात.

लाल रंगाची फळे आणि भाज्या खाणे किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

लाल रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात.

लाल रंगाच्या फळांमध्ये डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.

ज्यामुळे कर्करोगाचा, विशेषतः प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.

डाळिंब खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव होतो.

सफरचंद हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ मानले जाते.

सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

टरबूज खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. टरबूजमध्ये लायकोपीन आढळते.

ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. टरबूज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.