भारतात,प्राचीन काळापासून औषधांना पर्यायी औषध म्हणून मसाल्यांचा वापर केला जात आहे.

मसाल्यांचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

काळी मिरीमध्ये काही घटक आढळतात जे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात.

म्हणजेच ते शरीरातील पेशींचे संरक्षण करतात.तसेच,काळी मिरी रक्ताच्या नसा विस्तारण्यास मदत करते.

ज्यामुळे रक्तदाब आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

याशिवाय,आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते आणि घसादुखीसाठी सुध्दा उपयुक्त ठरते.

काळ्या मिरीमध्ये 'पाइपेरिन' नावाचे रसायन असते,जे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त प्रवाह योग्य ठेवण्यास मदत करते.

याशिवाय काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए, ई,सी देखील आढळते.

या गुणधर्मामुळे काळी मिरी अनेक रोगांवर मदत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.