महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हळद पिकाचे उत्पादन घेतलं जाते



सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणार जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे



त्यामुळं हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे



याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे



या संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे



10 कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे



महाविकास आघाडी सरकारनं 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती



त्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे



सप्टेंबला हा शासानिर्णय काढण्यात आला आहे



चालू आर्थिक वर्षांमध्ये दहा कोटी रुपये निधी वितरित करत असल्याची माहिती या शासन निर्णयात आहे



हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे