माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे .

यासोबतच माघी एकादशीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेची भव्य रांगोळी देखील साकारण्यात आली.

आज पहाटे विठ्ठलाची नित्य पूजा झाल्यानंतर माघी एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

माघी एकादशीनिमित्त विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समिती सदस्य शकुंतला नाडगिरे तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा सदस्य डॉ दिनेश कदम यांच्या हस्ते करण्यात आली.

आज माघी एकादशीचा सोहळा होत असताना पंढरपूरमध्ये चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.

माघी यात्रा ही वाळवंटातील यात्रा म्हणून ओळखली जात असल्याने सर्व पारंपरिक फडांची कीर्तन प्रवचन सेवा हे चंद्रभागा वाळवंटात होत असते.

विठ्ठल मंदिराला सण उत्सावासोबत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या निमित्ताने सजावट केली जाते.

आज माघी एकादशीनिमित्त केलेल्या फुलांच्या सजावटीमुळे विठुराया आणि रुक्मिणीचं रुप अधिक खुलून दिसत आहे.