उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला, शेती पाण्यात



उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान



मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला



शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबासह ऊस आणि इतर पिके वाहून गेली आहेत.



उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता



पाटकुल येथील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे



शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठं नुकसान झालं आहे



कालवा फुटल्यानं अनेक काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचेही मोठं नुकसान झाले



उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं ऊस शेतीचंही मोठं नुकसान



शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचल आहे.