बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले.
मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला.
नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फरहाननं लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'काही दिवसांपूर्वी मी आणि शिबानी लग्नबंधनात अडकलो आहोत.आम्ही त्या सर्वांचा आभार मानतो ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या.'
पुढे फरहाननं कॅप्शनमध्ये लिहिले ,'या सोहळ्याचे काही फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.'
शिबानीनं या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'Mr & Mrs'
शिबानीची बहिण अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर यांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावली
अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी देखील फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.