बहुपयोगी अशा नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हटलं जातं.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

अगदी तहान भागविण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत.

नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं.

त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो.

नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे.

नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते.

तसेच नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो.

नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते.

नारळाचे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते.