भारतात नेहमी कुठे ना कुठे भंडारा हा असतोच.
भंडाऱ्यातले अन्न आपण प्रसाद म्हणून खातो.
पण आता भंडाऱ्यात जेवण हे फक्त भारतीयांना नाही तर परदेशी लोकांना ही आवडू लागले आहे.
सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये एक फॉरेनर मुलगी भंडाऱ्यातले जेवण जेवताना दिसत आहे.
ही मुलगी फिनलंडमध्ये राहणारी आहे. तीने अगदी रांगेत उभे राहून भंडाऱ्याच्या जेवणावर ताव मारला.
तिने हा व्हिडिओ आपल्या instagram videshi__indian वर शेअर केला आहे.
ती सध्या भारतात राहते. तिचे नाव Kaisa Oljakka आहे.
तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोबतचं या व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.