'मुंज्या'ने पहिल्या दिवशी 4.21 कोटी रुपयांची कमाई केली. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा चित्रपट म्हणजे अलौकिक हॉरर आणि विनोद यांचं कॉम्बिनेशन आहे. 'मुंज्या' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. 'मुंज्या'ने आपल्या हॉरर आणि कॉमेडीच्या अनोख्या मिश्रणाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नुकताच रिलीज झालेला,'मुंज्या' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. जो आपल्या अद्भूत कॉमेडीने लोकांचं मनोरंजन करतोय या चित्रपटाची कथा एका तरुणाच्या भोवती फिरणारी आहे जो त्याच्या गावाला भेट देतो आणि कौटुंबिक रहस्य उघड करतो. या चित्रपटात CGI-ॲनिमेटेड पात्र आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग आणि इतर कलाकार आहेत. मुंज्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत. 7 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.