बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. धर्मेंद्र हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि देखणे अभिनेते आहेत. 'अॅक्शन हीरो' म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धर्मेंद्र यांनी 1960 साली अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आजवर त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमांत काम केलं आहे. धर्मेंद्र यांनी अभिनयासह सिनेनिर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. 'धर्मेंद्र' यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल असे आहे. पण ते 'धर्मेंद्र' याच नावाने परिचित आहेत. धर्मेंद्र यांचे सिनेमे चाहते आजही आवडीने पाहतात. त्यांनी व्यावसायिक सिनेमांपासून सामाजिक विषयांपर्यंत अनेक सिनेमे केले आहेत.