अभिनेता कुणाल ठाकूर आणि नृत्यांगना मुक्ती मोहन यांनी लग्नगाठ बांधली.

प्रसिद्ध डान्सर आणि टीव्ही होस्ट मुक्ती मोहनने अलीकडेच तिचा प्रियकर कुणाल ठाकूरसोबत लग्न केले.

मुक्तीने लग्नात पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला.

तर कुणालने क्रीम आणि लाल रंगाचे कपडे परिधान केले होते.

लग्नात दोघही खूपच सुंदर दिसत होते.

मुक्ती मोहनचा प्रियकर कुणाल ठाकूर हा अभिनेता आहे.

कुणाल ठाकूर नुकताच अ‍ॅनिमल या चित्रपटात दिसला.

मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर खूप सुंदर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

मुक्ती आणि कुणाल फोटोंमध्ये एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत.

चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्स करुन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.