दिवस की रात्र... कोणत्या वेळेत अभ्यास केल्यास जास्त लक्षात राहते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच की सकाळी अभ्यास करणे चांगले की रात्री?

Image Source: pexels

ज्येष्ठ मंडळी म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे अभ्यास केल्यास सर्व काही लक्षात राहते.

Image Source: pexels

सकाळचा वेळ अनेकदा “गोल्डन टाइम” म्हणून ओळखला जातो, यामागे काही कारणं आहेत.

Image Source: pexels

सकाळच्या वेळेत मेंदू ताजातवाना असतो आणि जवळपास गोंगाटही कमी असतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करून अभ्यास करता येतो.

Image Source: pexels

सकाळच्या वेळेत वाचलेल्या गोष्टी बऱ्याचदा जास्त काळ लक्षात राहतात, कारण त्यावेळी मेंदू पूर्णपणे सक्रिय असतो.

Image Source: pexels

जे विद्यार्थी लवकर उठण्याची सवय लावतात, त्यांच्यासाठी सकाळी अभ्यास करणे खूप प्रभावी ठरते.

Image Source: pexels

रात्री अभ्यास करण्याचे देखील फायदे आहेत. रात्रीच्या वेळी शांतता असल्याने अभ्यास चांगला होतो.

Image Source: pexels

रात्रीच्या वेळी कल्पकता वाढते, ज्यामुळे अभ्यास करताना अधिक कल्पना येतात.

Image Source: pexels

अभ्यास करताना लक्ष केंद्रित करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रात्र असो वा दिवस, त्याने फारसा फरक पडत नाही.

Image Source: pexels