सर्वात आधी टोमॅटो कमी पाण्यात उकळून घ्या.

त्यानंतर टोमॅटो गार पाण्यात टाकून त्याची साल काढून घ्या.

टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आता टोमॅटोच्या प्युरीमध्ये पाणी टाकून कमी गॅसवर शिजवून घ्या.

ते उकळल्यावर त्यात साखर, काळे मीठ, लाला मिरची पावडर टाका.

7 ते 8 मिनिटे ते त्याला कढ येऊ द्या.

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कॉनफ्लॉवर पावडर एकत्र करावी.

हे मिश्रण सुपात टाका.

एक उकळ आल्यावर गॅस बंद करा.

हे सूप थंडीत आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.