अभिनेत्री सारा अली खान तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने एका पुरस्कार सोहळ्याला देखील हजेरी लावली होती. वेस्टर्नप्रमाणेच सारा ट्रेडीशनल लूकमध्येही नेहमीच सुंदर दिसते. सारा अली खान तिच्या पारंपरिक लूकने सर्वांची मनं जिंकत आहे. नुकत्याच पार पडलेल्या IFFA 2022 सोहळ्यामध्ये साराने हा शरारा परिधान केला होता, जो अतिशय सुंदर दिसत आहे. लूक अतिशय साधा ठेवत तिने तिचे केस मोकळे सोडले होते. डोळ्यातं काजळ आणि कमीत कमी मेकअपमध्ये ती सुंदर दिसत होती. या रॉयल लूकमध्ये साराने सुंदर फोटोशूट केलं आहे, जे आता चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरलं आहे. सारा अली खान तिच्या पारंपरिक लूकने सर्वांची मनं जिंकत आहे. सारा अली खान नेहमीच आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.