अभिनेत्री दीपिका पादुकोणनं बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. सध्या दीपिका ही पती रणवीर सिंहसोबत सुट्टीसाठी परदेशात गेली आहे. दीपिकानं कोंकणी संमेलनात सहभाग घेतला होता. संमेलनासाठी दीपिकानं खास लूक केला होता. पिंक, गोल्डन कलरचा ड्रेस तसेच स्टोन इयरिंग्स आणि पायात गोल्डन हाय हिल्स असा क्लासी लूक दीपिकानं केला होता. दीपिकाचे काही आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. दीपिकाचा फायटर हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. अभिनेता प्रभाससोबत दीपिका एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. दीपिकाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. दीपिका तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.