धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.

अभिनय क्षेत्रात धुळ्याच्या मराठमोळ्या सोनाली साळुंकेनं उतुंग भरारी घेतली आहे.

धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.

महाविद्यालयात असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. यूथ फेस्टिवल , पुरुषोत्तम करंडक , जिभाऊ करंडक अशा स्पर्धा मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.

पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, शिक्षणासोबतच तिने आपली अभिनयाची आवडही जोपासली.

जयहिंद कॉलेजमधून तिने एमएससी पूर्ण केले आणि आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली.

गावाकडची असल्यामुळे कायम तिला तिच्या भाषेवरून चिडवलं जायचं पण तिने हार न मानता पुढील दिशेने वाटचाल केली.

आज ती फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे.

तिनं सोनी टीव्हीवर क्राईम पेट्रोलमध्ये सब इन्स्पेक्टरची भूमिका दमदारपणे साकारली आहे. त्यासोबतच तिने पंड्या स्टोअर, विघ्नहर्ता गणेशा, ग्यारह दिन सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय

आता ती रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.