तलवार गँगचा हैदोस सुरु असतानाच पुण्यनगरी पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने हादरले आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी शरद मोहोळवर समोरून गोळ्या झाडल्यानंतर गंभीर जखमी झाला.

यानंतर त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले,पण त्याचा मृत्यू झाला.

गुंड शरद मोहोळवर हत्या,हत्येचा प्रयत्न,खंडणी,अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुंडगिरीचा धंदा असूनही शरद मोहोळला राजकारणाचे वेध लागले होते.

त्यानी आपली प्रतिमा निर्मिती करण्यासाठी सामाजिक कार्यक्रम सुद्धा राबवण्यास सुरुवात केली होती.

मात्र,राजकारणात प्रवेश होण्यापूर्वीच आता त्याचा दिवसाढवळ्या गेम झाला आहे.

शरद मोहोळवर हल्ला कुणी केला?हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला का?

याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.