सेलू उपबाजारपेठेत कापसाच्या भावात प्रचंड तेजी



बाजारपेठेत कापसाला चांगलीच झळाली आल्याचे दिसत आहे.



कापासाला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा



सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेत शुक्रवारी पांढऱ्या सोन्याच्या भावाने विक्रमी उसळी घेतली



पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस 14 हजार 470 दराने खरेदी करण्यात आला



सेलूत शुक्रवारी तब्बल 400 क्विंटल कापसाची आवक झाली होती.



कापसाला दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



यंदाचा कापसाचा हंगाम संपत आला तरी, सेलू मार्केट यार्डमध्ये कापसाची आवक सुरुच आहे



बाजारपेठेत लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी होत असल्याने कापसाला चांगला दर मिळत आहे.



सेलू उपबाजारपेठेत 100 ते 125 कापूस गाड्यांनी कापूस विक्रीकरिता आला होता.