देशात कोरोना संसर्गबाधितांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून आले देशात मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे 1150 नवीन बाधितांची नोंद आणि चार संसर्गबाधितांचा मृत्यू झाला आहे देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून 11 हजार 558 इतकी झाली आहे कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 इतकी झाली आहे आकडेवारींनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 इतक्या कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. देशात 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 जणांना कोरोनाची लागण झाली होती देशात कोरोना प्रतिबंधक लशीचे 186 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहे शनिवारी, 12 लाख 56 हजार 533 इतके डोस देण्यात आले देशात आतापर्यंत 186 कोटी 51 लाख 53 हजार डोस देण्यात आले आहेत