देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत मार्च महिन्यानंतर देशात झालेली ही सर्वाधिक रुग्ण वाढ आहे देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे गेल्या 24 तासांत 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत