माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकत आहे. मानुषी म्हणते, मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर लगेचच माझ्या मनात अभिनयाचा विचार आला नव्हता. आदित्य चोप्रांनी मानुषीला सांगितले, ती अभिनय करू शकते. नंतर ऑडिशन झाले.मानुषीला राजकुमारी संयोगिताची भूमिका करायला सांगितली. मानुषी म्हणते, आयुष्यात कोणतीही वेळ आली तरी आपल्याला ती निभावून न्यावी लागते. कारण त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. मानुषीने चित्रपट साइन केल्यानंतर 9 महिने रोज 4 तास अभिनयाचा सराव केला. मानुषीने सांगितले, दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान मी फक्त ‘सम्राट पृथ्वीराज’ची वाट पाहत थांबले नाही, तर दुसरा चित्रपटही पूर्ण केला. तेव्हा थिएटर्स कधी उघडतील असे वाटू लागले होते. चित्रपट कधी येईल, कारण तो थिएटर्ससाठी बनला आहे. मानुषी म्हणते, माझा हा पहिला चित्रपट म्हणून नव्हे तर यासाठी हजारो लोकांनी मेहतन घेतली आहे. आता त्या मेहनतीचे चीज होताना दिसणार आहे.