कोरोनाच्या संसर्गात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी घट झाली आहे गेल्या 24 तासांत 3962 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली, तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे शुक्रवारी दिवसभरात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशातील कोरोना रुग्णांमध्ये गुरुवारी मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली त्यानंतर शुक्रवारी दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजारांवर पोहोचली आहेत भारतात सध्या 22 हजार 416 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत भारतात गेल्या 24 तासांत दोन हजार 697 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत आतापर्यंत देशात चार कोटी 26 लाख 25 हजार 454 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे