देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. पण कतरिना कैफ आता कोरोनामुक्त झाली आहे. किंग खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती. शाहरुखचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.