राहुल गांधी यांनी शनिवारी तुघलक लेनचा बंगला पूर्णपणे रिकामा केला. मोदींच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीबद्दल मानहानीच्या आरोपाखाली सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना न्यायालयाकडून 30 दिवसांचा अवधी मिळाला आहे. आपण यापुढेही लढत राहणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले ते म्हणाले की, 19 वर्षांनंतर मी घर सोडत आहे. हे घर देशातील जनतेचे आहे बंगल्याच्या चाव्या देताना राहुल गांधी भावूक झाल्याचं चित्र दिसून आलं. त्यांनी लोकसभा सचिवालयाला या चाव्या सुपूर्द केल्या आहेत