हे फोटो शिमला किंवा काश्मीरमधले नाहीत तर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगामधील आहेत.

सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये कडाक्याची थंडी पडत असून तापमान कमी झालं आहे.

परिणामी या भागातील शेतात आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतावरील दव बिंदू गोठल्याचं चित्र पाहायला मिळतं.

सातपुड्याच्या दुर्गम भागात पांढरी चादर पसरल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे.

उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे.

सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे इथे 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील दाब आणि वालंबा गावात अचानक तापमान घटल्यामुळे दव बिंदू गोठल्याची नोंद झाली आहे.

पुढील तीन ते चार दिवस थंडीची तीव्रता असेल आणि हवामान कोरडं राहिल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.