अनन्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

त्यामुळे अनन्याच्या मदतीला वडील चंकी पांडे धावून आले आहेत.

अनन्या पांडे अपूर्व मेहता यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाली होती.

या पार्टीसाठी तिने परिधान केलेला पोशाख खूप चर्चेत होता. त्यावरूनच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

अनन्या या पार्टीमध्ये कॉर्सेट बॉडीसूटसह काळ्या थाई-हाय स्लिट शीअर ड्रेस परिधान करून सहभागी झाली होती.

तिच्या या पोशाखातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

अनेकांनी तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केली.

काही लोकांनी तिच्या ड्रेसअपला खूपच वाईट असल्याचे म्हटले आहे.

नेटकऱ्यांच्या या कमेंट्सवर वडील चंकी पांडे म्हणाले, पालक म्हणून आम्ही तिला तिने कशी कडपे घालावीत याबद्दल कधीच सांगितले नाही.

आम्ही आमच्या दोन्ही मुलींना खूप चांगले वाढवले ​​आहे आणि त्या खूप हुशारही आहेत, असे चंकी पांडे यांनी म्हटले आहे.